खडकी बुद्रुक येथे एसटीला थांबा देण्याची रयत सेनेची आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे मागणी
चांदवड जळगाव महामार्गावरील खडकी बुद्रुक व हिरापूर या गावाच्या बसस्थानकावर एसटी न थांबता धावते त्यामुळे सकाळी शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर जाता येत नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून खडकी बुद्रुक व हिरापूर एसटी थांब्यावर दोन दिवसात एसटी न थांबल्यास रयत सेना विद्यार्थ्यांना सोबत घेत चाळीसगाव आगार डेपोच्या प्रवेशद्वारावर उग्र आंदोलन करणार असल्याचे आगार व्यवस्थापक मयूर पाटील यांना दि ११ रोजी रयत सेनेने दिलेल्या निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे,
अनेक एसटी तळेगाव कडूनच प्रवाशांनी भरून येत असल्याने त्या एसटीमध्ये बसण्यास विद्यार्थ्यांना जागा मिळत नाही ज्या एसटीमध्ये जागा असते त्या एसटीतील कंडक्टर विद्यार्थ्यांना बसू देत नाही तसेच काही एस टी कंडक्टर विद्यार्थ्यांना अपशब्द वापरत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एस टी कंडक्टर व वाहकांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांबरोबर अवमान कारक प्रकार तात्काळ थांबवून एस टी ची सुविधा विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी चाळीसगाव आगार व्यवस्थापक मयूर पाटील यांना रयत सेनेच्या वतीने दि ११ रोजी हिरापूर व खडकी बुद्रुक या एसटी थांब्यावर सकाळी साडे सहा वाजता सर्व एस टीच्या वाहकांना बस थांबण्याचे आदेश देऊन विद्यार्थ्यांना एस टी ची सुविधा उपलब्ध करून त्यांचा प्रवास सुकर करावा अन्यथा विद्यार्थ्यांना सोबत घेत चाळीसगाव आगार व्यवस्थापकांच्या प्रवेशद्वारावर १३ रोजी उग्र आंदोलन रयत सेना करेल व एकही एसटी एस टी आगारातून बाहेर जाऊ दिली जाणार नाही याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आगार व्यवस्थापक जबाबदार राहणार असल्याचे रयत सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ,निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, प्रदेश प्रदेश समन्वयक पी एन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड ,तालुका अध्यक्ष अनिल कोल्हे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, महेंद्रसिंग राजपूत शहीद पिंजारी, विद्यार्थिनी तेजस्वी तुपे, कल्याणी कोल्हे ,शुभांगी तुपे ,गायत्री तांबे, माधुरी कदम, देवयानी पाटील, सरिता वायकर ,कल्याणी पाटील, स्वरा शेलार यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत,