सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रसूती विभागात स्वच्छता कर्मचाऱ्याकडून रुग्णांच्या नातेवाईकांना पैशाची मागणी,

पैसे न दिल्यास महिला रुग्णाला नग्न अवस्थेत बाहेर आणणार, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा रुग्णाच्या नातेवाईकावर दबाव यवतमाळच्या वसंतराव नाईक जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रकार

Rohit Patil
  • Dec 12 2024 6:35PM
प्रसूती विभागात स्वच्छता कर्मचाऱ्याकडून रुग्णांच्या नातेवाईकांना पैशाची मागणी,
         पैसे न दिल्यास महिला रुग्णाला नग्न अवस्थेत बाहेर आणणार, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा रुग्णाच्या नातेवाईकावर दबाव
 यवतमाळच्या वसंतराव नाईक जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रकार 
यवतमाळ येथील स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील प्रसूती विभागात मोठी लूट सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला असून गोरगरीब रुग्णाकडून रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी प्रसुती झालेल्या महिलेचे घाण कपडे धुतले असे सांगून 400 ते 500 रुपयाची मागणी करत असल्याचा आरोप केला असून पैसे न दिल्यास रुग्णाला नग्न अवस्थेत बाहेर काढण्याचा कर्मचाऱ्यांनी दम भरला असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या चेतना राऊत यांनी सांगितले आहे. यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात यवतमाळ जिल्ह्यातून तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून गोरगरीब रुग्ण हे उपचाराकरिता येथे येत असतात अशातच रुग्णांच्या नातेवाईकांना गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक लूट करत असल्याचे उघड झाले असून या प्रकाराला प्रशासन जबाबदार असल्याचे सामाजिक कार्यकर्ता राऊत यांनी म्हटले आहे. तसेच दोषीवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिष्ठाता डॉक्टर गिरीश जतकर यांच्याकडे केली आहे.
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार