अग्रिस्टॅक योजनेला चिखली तालुक्यात सुरुवात .
राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची अग्रिस्टॅक (Agristack) (Digital Public Infrastructure for Agriculture) योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांस अनुसरुन अग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२४/प्र.क्र.१५७/१०१० दिनांक१४ .१०.२०२४ नुसार मान्यता दिली आहे.
योजनेचे अपेक्षित फायदे:
सदर योजनेमुळे पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल, पीएम किसान योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करुन घेण्यास सहाय्य मिळेल, शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषि इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करुन घेण्यात सुलभ राहील, पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाव शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल, किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दत होऊ शकेल, शेतकऱ्यांसाठी कृषि कर्ज, वित्त, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषि सेवा सहजपणे उपलब्ध करुन देण्यासाठी सुलभता येईल, शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, कृषि व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री) च्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरीत करण्यामध्ये सुलभता येईल आणि लाभार्थ्यांची वारंवार प्रमाणिकरणाची आवश्यकता राहणार नाही, शेतकऱ्यांना वेळेवर कृषि विषयक सल्ले, विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संथीमध्ये वाढीसह नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार-प्रचारात सफलता प्राप्त होईल. अग्रिस्टॅक योजनेचे प्रमुख्य घटकः-
अग्रीस्टॅक योजनेअंतर्गत पुढीलप्रमाणे तीन पायाभूत माहिती संच निर्माण करण्यात येणार आहेत. सदर तीनही पायाभूत माहिती संच है अग्रिस्टॅक योजनेसाठी आवश्यक इतर माहिती संच जसे बियाण्यांचा माहिती संच, कीटकनाशकांचा माहिती संच, मागणी बाबतचा माहिती संच, पुरवठ्याचा माहिती संच आदी कृषि विषयक धोरण आखणे व सबसिडी आधारीत योजना निर्मितीसाठी आवश्यक आहे.
:शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (Farmers Registry): यामध्ये शेतकऱ्याच्या शेताच्या माहीतीशी त्याचा आधार क्रमांक जोडावयाचा आहे व प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आय. डी.) द्यावयाचा आहे.
: हंगामी पिकांचा माहिती संच (Crop Sown Registry) यामध्ये शेतकरी ई-पिक पाहणी (DCS) मोबाईल
अॅप व्दारे नाव नोंदणी करुन ई-पिक पाहणी नोंद 15 जानेवारी पर्यंत पूर्ण करतील. क) भू संदर्भिकृत भूभाग असणारे गाव नकाशे यांचा माहिती संच (Geo- Referenced Land Parcel Cadastral Map)
सदर अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषि व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री) तयार करण्यात येणार असून उपलब्ध आकडेवारीच्या आधारे शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ वितरीत करण्यामध्ये सुलभ येईल आणि लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरणाची आवश्यकता (e-kyc) राहणार नाही.
सदर योजनेची मोहिम दिनांक १६डिसेंबर २०२४पासुन चिखली तालुक्यात सुरुवात करण्यात येणार आहे. या करीता गावनिहाय शिबीर आयोजित करण्यात येणार असून ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक/ग्रामसेवक यांचे पथक गावात उपस्थित राहणार आहेत. शिबीराच्या तारखांबाबत शेतकऱ्यांनी वरील ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक/ग्रामसेवक यांचेसोबत संपर्क करावा.
तरी सर्व शेतकरी बांधवांनी गावनिहाय आयोजित करण्यात येणाऱ्या शिबीरात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करुन दयावीत. तसेच https://mhfr.agristack.gov.in/ या लिंकचा वापर करुन स्वतः देखील शेतकरी नोंदणी करु शकतात. तरी अग्रिस्टॅक (Agristack)अग्रिस्टॅक योजनेचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा असे आवाहन श्री शरद पाटील उपविभागीय अधिकारी बुलडाणा व श्री संतोष काकडे तहसिलदार चिखली यांचेतर्फे करण्यात येत आहे.
प्रतिनिधी : योगेश शर्मा