बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार थांबवा, रामटेक येथे निघाला मोर्चा
देशात व राज्यात सर्वत्र गाजत असलेले प्रकरण, बांगलादेश हिंदू विरुद्ध अवमानना पाहता रामटेक येथे सकल हिंदू समाजातर्फे बांगलादेश हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार थांबवा, रामटेक येथे निघाला मोर्चा .
देशात व राज्यात सर्वत्र गाजत असलेले प्रकरण, बांगलादेश हिंदू विरुद्ध अवमानना पाहता रामटेक येथे सकल हिंदू समाजातर्फे बांगलादेश हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदू व इतर अल्पसंख्याक समाजातील लोकांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराच्या घटना याबाबत यावेळी निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने या अन्यायाविरुद्ध योग्य ते पाऊल उचलावे व तेथील अल्पसंख्याक समाजाला भयमुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मोर्चेकरी हातात बॅनर, झंडे व गळ्यात हिंदू प्रतीक भगवे दुपट्टे लावून बंगलादेशातील हिंदूंना वाचवा, सकल हिंदू समाजाचा विजयी असो, असे नारे लावण्यात आले, विशेष म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश पाहायला मिळाला, जनआक्रोश मोर्चा शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघून आंबेडकर चौक, गांधी चौक व नंतर उपविभागीय कार्यालयात पोहचला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले, तालुकाध्यक्ष राहुल किरपान, उमेश पटले, संजय बिसमोगरे, कविता मुलमुले, शिवसेनेचे सुमित कोठारी, विकेंद्र महाजन, राजेश किंमतकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
प्रतिनिधी: दीपचंद शेंडे रामटेक.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प