सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवाजीनगर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत 7 मोटरसायकल असा सुमारे 2 लाख 5 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलिसांना चोरीच्या ७ मोटर सायकली जप्त करून २ लाख ५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करत चोरीचे -५ गुन्हे उघड करण्यात यश मिळवले.शिवाजीनगर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाने सदर कारवाई केल्याची माहितीपोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

Rohit Patil
  • Dec 14 2024 2:55PM
 शिवाजीनगर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत 7 मोटरसायकल असा सुमारे 2 लाख 5 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. 
 
 इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलिसांना चोरीच्या ७ मोटर सायकली जप्त करून २ लाख ५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करत चोरीचे -५ गुन्हे उघड करण्यात यश मिळवले.शिवाजीनगर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाने सदर कारवाई केल्याची माहितीपोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली.इचलकरंजी पोलीस ठाण्यात विशाल थोरात मुसळे हायस्कूल जवळ यांनी २५ सप्टेंबर रोजी रोजी १ ते ६ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंद झाला होता. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना धर्मराज चौक येथे पवन दिलीप लोकरे वय २६ रा.तळंदगे फाटा,पट्टणकोडोली ,राकेश कमलाकर माने , वय २८ रा.रांगोळी ता. हातकणंगले हे संशयास्पद रीतीने विनानंबर प्लेट गाडीवरून फिरत असताना आढळून आले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर मोटारसायकल त्यांनी ३-४ वर्षांपूर्वी इचलकरंजीतुन चोरी केल्याची माहिती दिल्याने त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी सदलगा कर्नाटक,गोकुळ शिरगाव,शिरोळ,शाहूपुरी येथे चोरी केल्याचे कबूल केले,त्यांच्याकडून ७ मोटारसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील मा. उप विभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. सचिन पाटील,सहा फौजदार रावसाहेब कसेकर,पो.अं.विजय माळवदे,सुनील बाईत,सतीश कुंभार,सुकुमार बरगाले,पवन गुरव,अरविंद माने यांनी केली.
प्रतिनिधी- रोहन हेरलगे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार