डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात सर्वपक्षीय महिला मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधींचा स्वागत सोहळा!
आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनच्या अनुषंगाने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय महिला आमदारांची बैठक झाली. यावेळी त्यांनी महिला विकास, सक्षमीकरण, हिंसाचार आणि चारित्र्य हनन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात सर्वपक्षीय महिला मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधींचा स्वागत सोहळा!
' शक्ती व्यासपीठावर' केली सविस्तर चर्चा
नागपूर दि. १६ : आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनच्या अनुषंगाने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय महिला आमदारांची बैठक झाली. यावेळी त्यांनी महिला विकास, सक्षमीकरण, हिंसाचार आणि चारित्र्य हनन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
याविषयी बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामात जरी फरक असला तरी पण त्यातील नियम बरेचसे सारखे आहेत. ज्यावेळी आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो त्यावेळी समाज अर्थातच बघतो की तुम्ही महिला आहात म्हणजे तुम्ही महिलांचे प्रश्न सोडवलेच पाहिजेत पण लोकप्रतिनिधी परिषदेतले असो किंवा सभेतले असो तुम्हाला महिला आणि पुरुष असे दोघांचेही प्रश्न सोडवावे लागतात आणि हे प्रश्न सोडवत असताना अडचणीचा मुकाबला हा खास स्त्रियांना करावा लागतो.
एक म्हणजे सातत्याने आर्थिक चंचन, दुसरं म्हणजे हिंसाचाराची भीती तिसरं म्हणजे चारित्र्य हनन हे सतत होत असते. मग तुम्ही केस कसे सोडता, पिन कशी लावता, केस का शॉर्ट आहेत, कानात काय घालता, गळ्यात काय घातला अशा प्रश्नांची उत्तरं आमदार झाल्यावरही तुम्हाला द्यावी लागतात. परंतु जे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्या सगळ्या प्रश्नांवरती राज्य सरकारने चौथे महिला धोरण तयार केलेले आहे. आज महिला व बालविकासाचे आयुक्त माझ्याकडे भेटायला आले होते तर त्यांना मी सुचवलेलं आहे की, प्रत्येक महिला लोकप्रतिनिधी त्यांच्या भागामध्ये नावीन्यपूर्ण काही करता येईल का? या कामामध्ये त्याचा खास सहभाग घेतला तर त्या महिला धोरणाला जास्त अर्थ प्राप्त होईल.
१९९५ ला एक जागतिक महिला विकासाचा आराखडा ठरलेला होता त्यानुसार कितपत अंमलबजावणी झाली यासाठीचा आढावा घेण्याचं काम आता २०२५ मध्ये होणार आहे. तर आपणसुद्धा महाराष्ट्रामध्ये काय प्रगती झाली वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये त्याचे विविध प्लॅटफॉर्मवर आहेत. त्यामध्ये काय काम झाले याबाबत आढावा होईल." असं उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
यानंतर, बोलताना विधानपरिषद आमदार चित्रा वाघ म्हणाल्या, "विशाखा कायद्यामध्ये अंमलबजावणी आवश्यक आहे, बळकटीकरणासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करायचे आहे."
"महिलांच्या जीवनात बदल घडवू, त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शनही आवश्यक आहे", असं महिला आमदारांच्या बैठकीत विधान परिषद आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या.
त्याचवेळी, "लोकशाहीच्या पवित्र मंदिरात महाराष्ट्रातील माता-भगिनींचे प्रतिनिधित्व करत असताना आपण सर्वांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकजुटीने प्रयत्न करू, त्यासाठी विधिमंडळाच्या महिला सदस्य म्हणून आपण सर्वांनी एकमेकांसोबत सातत्यपूर्ण संवाद राखूया", अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार, मंत्री अदिती तटकरे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला भाजप आमदार चित्रा वाघ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार सना मलिक, विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे, उमा खापरे, संजना जाधव, आमदार मंत्री अदिती तटकरे आणि स्त्री आधार केंद्राच्या जेहलमताई जोशी उपस्थित होत्या.
चंद्रपूरमधील महिला बचत गटाने बांबूपासून बनवलेली सावित्रीबाई फुलेंची फ्रेम आणि पुष्पगुच्छ देत त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प