सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गडचिरोली पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णक्षण – मा. पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांची अतिदुर्गम पेनगुंडा पोमकेंला भेट

17 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम आणि अतिसंवेदनशील भागात नव्याने स्थापन झालेल्या पोलीस मदत केंद्र पेनगुंडा व उपपोस्टे लाहेरीला भेट दिली. त्यांच्या या ऐतिहासिक भेटीमुळे पोलीस दल व नागरिकांमध्ये नवसंजीवनी निर्माण झाली.

Rohit Patil
  • Dec 17 2024 7:16PM
गडचिरोली पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णक्षण – मा. पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांची अतिदुर्गम पेनगुंडा पोमकेंला भेट

पेनगुंडा परिसरात महाजनजागरण मेळाव्यात नागरिकांसोबत संवाद व विकासाचे आश्वासन

दि. 17 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम आणि अतिसंवेदनशील भागात नव्याने स्थापन झालेल्या पोलीस मदत केंद्र पेनगुंडा व उपपोस्टे लाहेरीला भेट दिली. त्यांच्या या ऐतिहासिक भेटीमुळे पोलीस दल व नागरिकांमध्ये नवसंजीवनी निर्माण झाली.

पेनगुंडा येथे महाजनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मा. पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्या हस्ते विविध शैक्षणिक, गृहउपयोगी व क्रीडासाहित्यांचे वितरण करण्यात आले. या मेळाव्यात 1000 हून अधिक नागरिक उपस्थित होते. नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी आश्वासन दिले की, या नव्या पोलीस मदत केंद्रामुळे परिसरातील समस्या सोडवण्यासाठी गडचिरोली पोलीस दल प्रयत्नशील राहील

मा. शुक्ला यांनी आपल्या भाषणात माओवाद निर्मूलनाचे आश्वासन दिले. त्यांनी पेनगुंडा परिसरात रस्ते, आरोग्यसेवा, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधा लवकरच उपलब्ध होतील असे सांगितले. तसेच पोलीस अधिकारी आणि जवानांना स्थानिक नागरिकांसोबत सलोख्याने काम करण्याचे निर्देश दिले.

भेटीदरम्यान मा. पोलीस महासंचालकांनी उपस्थित जवानांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पोमकें पेनगुंडा येथे उपस्थित उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते आणि सी-60 जवान श्रीराम सोरी यांच्या वाढदिवसाचा आनंद त्यांनी केक कापून साजरा केला. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बडाखाण्याच्या आयोजनासाठी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
पेनगुंडा भेटीनंतर मा. पोलीस महासंचालकांनी उपपोस्टे लाहेरी येथे भेट दिली. येथे त्यांनी माओवादविरोधी मोहिमेचा आढावा घेत वृंद परिषद घेतली व जवानांसोबत भोजनाचा आनंद घेतला.

या दौऱ्यात मा. अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, राज्य गुप्तवार्ता आयुक्त शिरीष जैन, नक्षलविरोधी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोली परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गडचिरोलीच्या विकासासाठी पुढचे पाऊल

मा. पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांचा हा दौरा केवळ पोलीस दलाच्या मनोबलासाठीच नव्हे, तर दुर्गम भागातील नागरिकांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे. पेनगुंडा व लाहेरी येथील पोलीस मदत केंद्रे येत्या काळात माओवाद निर्मूलन आणि विकासामध्ये निर्णायक भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार