भगवान श्री महावीर जयंतीनिमित्त ठाणे जैन महासंघाच्या रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडून जैन बांधवांना दिल्या महावीर जयंतीच्या शुभेच्छा
ठाणे :- भगवान श्री महावीर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे ठाणे शहरात ही आज श्री ठाणे जैन महासंघाने च्या वतीने आयोजित केलेल्या भव्य रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून या यात्रेचा शुभारंभ केला. तसेच यानिमित्ताने जैन मुनींचे त्यांनी शुभआशीर्वाद देखील घेतले, तसेच जैन बांधवांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी भगवान श्री महावीरांचे विचार आचरणात आणून मार्गक्रमण करणारा जैन समाज हा अत्यंत शांतताप्रिय समाज आहे. या समाजाने क्षमाशील वृत्ती जोपासून मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याला प्राधान्य दिले आहे. आज भगवान महावीरांच्या जयंतीदिनी त्यांचे हेच विचार आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरावे आशा शुभेच्छा सर्वांना देत असल्याचे सांगितले.
राज्यात युती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वच सणावरील निर्बंध हटले असून त्यामुळेच आज महावीर जयंतीनिमित्त निघणारी रथयात्रा देखील त्याच उत्साहात निघत असल्याचे यावेळी सांगितले. तसेच समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार असून यापुढेही सर्वसामान्याना न्याय देण्यासाठी ते कटिबद्ध असेल असेही यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप प्रदेश सचिव संदीप लेले आणि श्री ठाणा जैन महासंघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प