सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाकुंभ प्रयागराजमध्ये महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा जगद्गुरु पदी भव्य पट्टाभिषेक सोहळा संपन्न

या उपक्रमामुळे हिंदू धर्मसंस्कृतीच्या जतन आणि प्रचार-प्रसाराला मोठा हातभार लागत आहे.

Sudarshan MH
  • Feb 2 2025 6:35PM
प्रयागराज: तिर्थराज प्रयाग येथे सुरु असलेल्या महाकुंभ पर्वाच्या पावन अवसरावर, श्री शंभू पंचदशनाम जुना आखाड्याच्या सर्व गुरुमूर्तींच्या प्रेरणेने आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरीगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने, जुना पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते, महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना जगद्गुरु पदाचा पट्टाभिषेक प्रदान करण्यात आला.
 
 
प्रयागराजच्या पुण्यभूमीत पार पडलेल्या या भव्य सोहळ्याला हजारो साधू-संत, महंत आणि लाखो भाविकांनी साक्षीदार म्हणून उपस्थिती लावली. शंभू पंचदशनाम जुना आखाड्याने त्यांच्या महान कार्याची दखल घेत, स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना अखाड्याचे दुसरे जगद्गुरु पद प्रदान केले. महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज हे जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांचे उत्तराधिकारी असून, त्यांनी लाखो भक्तांना ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचा मंत्र देत, अनुष्ठान परंपरा अखंडपणे पुढे सुरू ठेवली आहे. विशेष म्हणजे, जगद्गुरु जनार्दन स्वामींनी घेतलेल्या संकल्पानुसार, महाराष्ट्र राज्यात बाराशे ज्योतिर्लिंगांचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, तो पूर्ण करण्यासाठी स्वामी शांतिगिरीजी महाराज अथक परिश्रम घेत आहेत. या उपक्रमामुळे हिंदू धर्मसंस्कृतीच्या जतन आणि प्रचार-प्रसाराला मोठा हातभार लागत आहे.
 
महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी अनेक महान धार्मिक व सामाजिक कार्ये केली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध धर्मपरिषदांचे आयोजन, साधू-संतांचे मार्गदर्शन, भक्तगणांसाठी अध्यात्मिक उपदेश, तसेच गरजू आणि गरीबांसाठी अनेक सेवा प्रकल्प राबवले गेले आहेत. त्यांच्या अध्यात्मिक कार्यामुळे संपूर्ण भारतभर त्यांचा मोठा भक्त परिवार तयार झाला आहे.
 
महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना जगद्गुरु पदवी मिळाल्याने "जय बाबाजी भक्त परिवार" यांच्या वतीने मोठ्या आनंदाचा उत्सव साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने शंभू पंचदशनाम जुना आखाड्याचे आचार्य पीठाधीश्वर महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज आणि आखाड्याचे महंत स्वामी हरीगिरीजी महाराज यांचे विशेष आभार मानण्यात आले.
 
महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची जगद्गुरु पदावर नियुक्ती झाल्यामुळे हिंदू धर्मसंस्कृतीच्या उन्नतीसाठी नवा अध्याय सुरू झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संत परंपरा अधिक बळकट होईल आणि समाजाला आध्यात्मिक उन्नतीचा मार्गदर्शन मिळेल, अशी श्रद्धाळू भक्तगणांची श्रद्धा आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार