सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सोलापूरमध्ये बोगस कंपनीच्या आधारे जप्त साखर.....

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी जप्त केलेल्या बार्शी तालुक्यातील आदित्यराज साखर कारखान्याची मालमत्ता बोगस कंपनीच्या आधारे बळकावण्याचा प्रयत्न उजेडात आला आहे.

Sudarshan MH
  • Dec 15 2021 10:10AM

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी जप्त केलेल्या बार्शी तालुक्यातील आदित्यराज साखर कारखान्याची मालमत्ता बोगस कंपनीच्या आधारे बळकावण्याचा प्रयत्न उजेडात आला आहे. या प्रकरणी लातूरच्या दोघाजणांविरूध्द सोलापुरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात जिल्हा बँकेची भूमिकाही संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. अमर साहेबराव मोरे व नितीन चांदमल सुराणा (दोघे रा. मुरूड, जि. लातूर) यांच्या विरोधात औरंगाबादच्या श्रीवर्धन ॲग्रो प्रा. लि. कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक किशन एकनाथराव कांगणे (रा. गजानन नगर पैठण रोड, औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बार्शी तालुक्यातील हत्तीज येथील आदित्यराज शुगर प्रा. लि. ची मालमत्ता कर्ज थकबाकीमुळे जप्त केली होती. बँकेने या साखर कारखान्याची मालमत्ता विक्रीस काढण्याचे ठरवून त्यासाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यानुसार ही मालमत्ता विकत घेण्यासाठी औरंगाबादच्या श्रीवर्धन कंपनीसह इतर काही कंपन्या पुढे आल्या होत्या. बँकेने संबंधित मालमत्तेची विक्री मूल्य ८ कोटी १६ लाख १७ हजार रूपये निश्चित केले होते. श्रीवर्धन कंपनीने संबंधित मालमत्ता खरेदीसाठी ९ कोटी ३० लाख रूपयांचा प्रस्ताव दिला होता.

खरेदी व्यवहारात वाटाघाटीच्यावेळी मूल्य रकमेच्या २५ टक्के इतकी रक्कम जमा करण्याची अट बँकेने घातली होती. या अटीनुसार कोणीही २५ टक्के रक्कम भरली नाही. त्यामुळे बँकेने मालमत्ता विक्रीबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवला होता. या घटना ६ जुलै २०२१ ते २९ जुलै दरम्यान घडल्या.

दरम्यान, त्यानंतर जिल्हा बँकेने इंडस् आॕरगो फार्मर अलाईड इंडस् प्रा. लि. (मुरूड, जि. लातूर) या कंपनीला संबंधित आदित्यराज साखर कारखान्याची जप्त मालमत्ता विक्री करून त्यात २५ टक्के रक्कमही स्वीकारल्याची माहिती समोर आली. तेव्हा संबंधित इंडस् आॕरगो फार्मर कंपनीबाबतची माहिती प्राप्त केली असता जप्त मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहाराच्या प्रक्रियेच्या काळात या कंपनीची कंपनी कायद्याप्रमाणे नोंदणीच केली नसल्याचे दिसून आले.

 

 
 

 

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार