सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाकुंभला जाणाऱ्या ताप्तीगंगा एक्सप्रेसवर दगडफेक; दगडफेकीत खिडकीच्या काचाही फुटल्या!

या घटनेत ताप्तीगंगा एक्सप्रेस गाडीच्या B 6 या डब्याच्या एका खिडकीच्या काचा फुटल्या आहे.

Sudarshan MH
  • Jan 13 2025 10:41AM

जळगाव: प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक जात आहे. या दरम्यान धक्कादायक प्रकार घडला आहे. महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत खिडकीच्या काचाही फुटल्या आहेत. परंतु सुदैवाने यात कोणीच जखमी झाले नाही. सुरतवरुन प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी रेल्वे जात होती. ही रेल्वे जळगाव आली. जळगाव रेल्वे स्थानकावरुन ही गाडी सुटली. पुढे तीन किलोमीटर गेल्यावर त्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. सुरतहून प्रयागराजकडे जाणारी ही ताप्तीगंगा एक्सप्रेस होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सुरत होऊन छपराकडे ही रेल्वेगाडी जात होती. जळगाव रेल्वे स्थानकावरून निघाल्यानंतर काही अंतरावर एका टवाळा खोलाने गाडीवर दगड मारून फेकल्याची रेल्वे पोलीस निरीक्षकांनी दिले आहे. गाडीवर ही दगडफेक झाली नाही. एका टवाळखोराने खोडकरपणा म्हणून गाडीवर दगड मारून फेकण्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांनी बोलताना दिले आहे. या घटनेमध्ये कुणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सुरतवरून निघालेली ट्रेन जळगाववरून निघाल्यानंतर काही अंतरावर दगडफेक करण्यात आली. या घटनेत गाडीच्या B 6 या डब्याच्या एका खिडकीच्या काचा फुटली आहे. त्यासंदर्भात काही प्रवाशांकडून व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलिसांनी सबंधित दगड मारणाऱ्या अज्ञात ढवाळखोरांचा शोध सुरू केला आहे. कोचमध्ये बसलेल्या प्रवाशांनी रेल्वे मंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार