सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

BCCI नं रद्द केली मोठी क्रिकेट स्पर्धा

भारतीय क्रिकेटपटू घडवणारी सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) घेतला आहे.

Sudarshan MH
  • Jan 30 2021 12:10PM

भारतीय क्रिकेटपटू घडवणारी सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं  घेतला आहे. BCCI चे सचिन जय शहा यांनी याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना पत्राद्वारे कळवली आहे. त्याचबरोबर रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज 45 हजार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील BCCI नं घेतला आहे.

कोणती स्पर्धा होणार?

सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धा  सध्या सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी  स्पर्धा घेण्याचा निर्णय BCCI नं घेतला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमनध्ये एक दिवसांच्या लढती असतात.

मुश्ताक अली स्पर्धेच्या धर्तीवर देशातील सहा मुख्य शहरांमध्ये विजय हजारे स्पर्धा देखील खेळवली जाणार आहे. पुढच्या आठवड्यात या स्पर्धेचं वेळापत्रक अंतिमकरण्यात येईल. त्यानंतर खेळाडू बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. एक महिना ही स्पर्धा चालणार आहे. विजय हजारेसह महिलांच्या वरीष्ठ गटातील वन-डे स्पर्धा खेळवण्याचा निर्णय देखील BCCI नं घेतला आहे.

 

काय आहे कारण?

BCCI कडं रणजी स्पर्धा घेण्यासाठी पुरेसा वेळ नाही. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मार्च महिन्याच्या शेवटी सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्पर्धेतील खेळाडूंना आयपीएलसाठी उपलब्ध राहवं लागेल.

रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमधील कोणती स्पर्धा खेळवायची याबाबत BCCI मध्ये संभ्रम होता. त्यामुळे त्यांनी सर्व राज्य संघटनांना पत्र लिहून त्यांचं मत विचारलं होतं. त्यावेळी बहुतेक संघटनांनी विजय हजारे ट्रॉफी खेळवण्यास पसंती दिली होती. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली मात्र रणजी ट्रॉफी खेळवण्याच्या बाजूनं होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार