सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शोएब अख्तरने 16 वर्षांपूर्वी मुल्तान कसोटीबाबत सेहवागनं केलेलं वक्तव्य खोटं असल्याचा खळबळजनक दावा

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं पाकिस्तानविरुद्ध 16 वर्षांपूर्वी कसोटीमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली होती. पाकविरुद्ध मुल्तान कसोटीमध्ये 309 धावांची खेळी करत सेहवागनं इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच क्रिकेटपटू होता

Aishwarya Dubey
  • May 11 2020 2:21PM

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं पाकिस्तानविरुद्ध 16 वर्षांपूर्वी कसोटीमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली होती. पाकविरुद्ध मुल्तान कसोटीमध्ये 309 धावांची खेळी करत सेहवागनं इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच क्रिकेटपटू होता. मात्र याच कसोटीवेळी आणखी एक घटना घडली होती त्याबद्दल सेहवागनेच खुलासा केला होता. आता सेहवागचं त्याबाबतचं वक्तव्य संपूर्ण खोटं असल्याचा धक्कादायक दावा पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं केला आहे.

मुल्तान कसोटी बाप हा बाप असतो असं सेहवागनं म्हटल्याचं साफ खोटं असल्याचा दावा शोएब अख्तरनं केला आहे. मुल्तान कसोटीत असं काही झालंच नाही असं अख्तर म्हणाला. हेलो अॅपवर बोलताना अख्तर म्हणाला की, विरेंद्र सेहवागनं सांगितलेल्या या गोष्टी खोट्या आहेत. सेहवागला त्याने कधीच हुक मारण्यासाठी सांगितलं नाही. या मुद्द्यावर गंभीर आणि सेहवागशी 2011 मध्येही चर्चा केली होती. याबद्दल गंभीरला माहिती आहे असंही अख्तरने सांगितलं.

सेहवाग म्हणाला होता की, कसोटी सामन्यावेळी शोएब अख्तर इतका वैतागला की त्यानं शॉर्ट बॉल टाकायला सुरुवात केली. तेव्हा अख्तरनं सेहवागला हुक शॉट मारायला सांगितलं. त्यानंतर सेहवागनं अख्तरला सांगितलं की, नॉन स्ट्राइकला तुझा बाप उभा आहे त्याला हुक मारायला सांग. त्यावेळी नॉन स्ट्राइकला सचिन तेंडुलकर उभा होता.

शोएब अख्तरने या मुलाखतीत असंही सांगितलं की, मुल्तान कसोटीत कधीच सेहवागला चौकार मारण्यासाठी सांगितलं नाही. विरेंद्र सेहवागने मुल्तान कसोटीबद्दल सांगितलं होतं की त्याला फलंदाजीवेळी शोएब अख्तर सारखं चौकार मार असं म्हणत होता. यावर सेहवागनं अख्तरला विचारलं होतं की, तू गोलंदाजी करतोयस की भीक मागतोय.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार