Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din: अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्यात. जाणून घेऊया...
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा १६ जानेवारी हा राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. १४ मे १६५७ रोजी पंरदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचा राज्याभिषेक १६ जानेवारी १६८२ रोजी संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ९ महिन्यांनी त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. स्वराज्याचे किंवा मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती अशी संभाजी महाराज यांची ओळख आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे विद्वान राजे म्हणून ओळखले जातात. त्यांनी बुधभूषण, नायिकाभेद, नखशीख, सतसतक हे ग्रंथ लिहिले. पैकी बुधभूषण हा संस्कृत भाषेतील ग्रंथ आहे. तर नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेत लिहिले होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलवारबाजीत निपुण होते. त्यांना युद्धकलेचे उत्तम ज्ञान होते. त्यांनी मोगलांबरोबरच, आदिलशहा, सिद्धी आणि पोर्तुगिजांविरुद्ध संघर्ष केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने रायगड किल्ला काबीज करण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु, त्याला त्यात यश मिळाले नाही. पंरतु औरंगजेबाने शपथ घेतली की छत्रपती संभाजीला अटक होईपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मेहुण्याने त्यांच्याशी गद्दारी केली आणि महाराज पकडले गेले. त्यांनी अत्याचाराविरुद्ध धैर्याने लढा दिला शेवटी ११ मार्च १६८९ रोजी त्यांनी वीरमरण आले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या या मंगल प्रसंगी स्वतःच्या नावाची नाणे पाडली ज्यावर पुढच्या बाजुवर 'श्री राजा शंभूछत्रपती' तर मागच्या बाजुवर 'छत्रपती' अस अक्षरं कोरलेली पाहायला मिळतात. संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर लगेचच बुन्हाणपुरवर छापा टाकुन त्यांनी १ करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली. तसेच पुढील आठ वर्षात शिवरायांच्या स्वराज्यात दुप्पटीने वाढ, सैन्य आणि खजिन्यालही तिपटीने वाढ झाल्याचा उल्लेख आहे. मात्र या नव्या दमाच्या सेनानीच्या नेतृत्वाखाली मोहीम फत्ते करण्यासाठी जुने जाणते सरदारही उत्साही असंत, इतकी छाप छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कुशल युद्धकौशल्याने पाडली होती. अशा या छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मुजरा.