सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बेल्जियमकडून भारतीय टीमचा पराभव, 41 वर्षांनंतर भारतीय टीमचं हॉकी मेडलचं स्वप्न भंगलं

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारत आणि बेल्जियम यांच्यात झालेली सेमी फायनल मॅच खूपच अटीतटीची झाली.

Sudarshan MH
  • Aug 3 2021 8:58AM

 टोकियो ऑलिम्पिक मध्ये पुरुष हॉकीच्या सेमीफायनल मध्ये भारत आणि बेल्जियम यांच्यात झालेली मॅच सुरुवातीला खूपच अटीतटीची झाल्याचं पहायला मिळालं. भारतीय हॉकी टीमला विश्वविजेत्या बेल्जियमने 5-2 ने पराभूत केलं आहे.

मॅच सुरू होताच बेल्जियमने भारतीय हॉकी टीम विरुद्ध पहिला गोल केला. त्यानंतर भारतीय टीमने सुद्धा बेल्जियम विरुद्ध गोल करत बरोबरी केली. यानंतर भारतीय टीमने आणखी एक गोल करत 2-1 ने आघाडी घेतली. मग, बेल्जियमच्या टीमने सुद्धा गोल करत 2-2 ने बरोबरी केली. त्यानंतर पुन्हा बेल्जियमच्या टीमने एका मागे एक असे दोन गोल करत 5-2 ने आघाडी घेतली आणि विजय मिळवला.

पंतप्रधान मोदी सुद्धा पाहत होते मॅच

पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा भारत विरुद्ध बेल्जियम ही सेमीफायनल मॅच लाईव्ह पाहत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन भारतीय टीमला प्रोत्साहन दिले आणि शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटलं, मला माझ्या टीमचा आणि त्यांच्या कौशल्याचा अभिमान आहे.

भारत विरुद्ध बेल्जियम मॅचेसची आकडेवारी

2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमने भारताचा 3-0ने पराभव केला होता. तर 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमने 3-1 ने पराभूत केलं होतं.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार