सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; धमकी प्रकरणातील महिलेला अटक

मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला आहे.

Sudarshan MH
  • Nov 28 2024 12:31PM

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या फोननंतर मुंबई पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा कसून शोध घेण्यात आला. आता या प्रकरणी अंबोली पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. हा फोन करणाऱ्या महिलेने नरेंद्र मोदींना मारण्याचा प्लॅन झाल्याचा दावा केला आहे. तर या फोन कॉल प्रकरणी शितल चव्हाण नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याआधीही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. समाज माध्यमावर हातात तलवार घेऊन त्याने एक व्हिडीओ शेअर केला होता. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार, अशी धमकी समाज माध्यमावर देण्यात आली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमधील सूरपूर पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महिलेला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेच्या विचारपूस दरम्यान कोणतीही संशयित माहिती समोर आली नाही. कौटुंबिक वादामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या महिलेने हा फोन केल्याने प्राथमिक पोलिस तपासात ही बाब समोर आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार