सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

औरंगजेबाच्या थडग्यावरील फलक हटवण्याचे आदेश अधिवेशनातच द्या; मुख्यमंत्री फडणवीसांना हिंदू एकता आंदोलनाचे निवेदन

औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे.

Sudarshan MH
  • Mar 22 2025 10:27AM

मुंबई: राज्यात खुलताबाद येथे क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे असून त्यात थडग्याचे रूपांतर दर्ग्यात आणि दर्ग्याचे रूपांतर मशिदीत झाले आहे. थडग्याच्या बांधकामावर हजरत औरंगजेब आलमगीर या नावाने फलक लावला असून क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे पूर्वी केवळ दगडी बांधकामाचे होते. आता त्याला संगमरवर लावून सजवले आहे. या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर कट्टरपंथीय मुसलमान आणि ओवैसी बंधू, तसेच काही राजकीय नेते गलफ अन् चादर चढवतात, त्या ठिकाणी नमाज पढतात. या सर्व गोष्टी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाचा अपमान करणार्‍या आहेत. छत्रपती संभाजी नगर प्रशासनाला हा फलक हटवण्यास सांगून त्या जागी क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे अशा नावाचा फलक लावून औरंगजेबाच्या थडग्यावर गलफ आणि चादर चढवायला बंदी घालावी.

तसेच औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष मा. आमदार नितीन शिंदे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार