पुणे: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात एक महत्त्वाची मोठी अपडेट समोर आली आहे. अखेर पुण्यात वाल्मिक कराड सीआयडीला शरण गेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तो मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी होता. त्या गुन्ह्यात तो शरण गेल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी म्हणाली, की आम्हांला लवकरात - लवकर न्याय मिळाला पाहिजे, हीच मागणी आहे. पोलीस यंत्रणा काम करत आहे तर मग इतका वेळ का लागत आहे? गुन्हेगार स्वत: शरण येत असेल तर मग पोलीस यंत्रणा काय काम करत आहे? आरोपींना पकडायला इतका वेळ का लागत आहे? मग, आम्हांला न्याय कसा आणि कधी मिळणार? असे प्रश्न वैभवी देशमुखने विचारले आहेत.