पुणे: सामाजिक माध्यमांपैकी एक असलेल्या इंस्टाग्रामवर पीडित महिलेची जिहादी तन्वीर शेख याच्याशी ओळख झाली. आरोपीने पीडितेला अपकीर्त करण्याची आणि तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन संगमनेर आणि भंडारदरा येथे नेले. तिथे त्याने १४ मार्च या दिवशी साथीदार जिहादी सोहेल शेखसह तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा नोंद झाल्यापासून आरोपी पसार झाले होते.
या प्रकरणी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी समांतर तपास यंत्रणा राबवली. तपासाच्या वेळी आरोपी गोवा राज्यातून पुणे येथे गेल्याचे समजले. पुण्यात चंदननगर परिसरातून आरोपींना अटक करून तपासासाठी एमआयडीसी (अहिल्यानगर) पोलीस ठाण्यात उपस्थित करण्यात आले आहे.