छत्रपती संभाजी नगर येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा परिसरातील खंडोबा देवस्थानाच्या यात्रेस सुरुवात
येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाच्या नावानं चांगभलं महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा यांचा आज पासून यात्रेचा शुभारंभ झाला असून आज प्रति सातारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील छोट्या सातारा येथे खंडोबा देवस्थानात दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली असून संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी भाविक येथे येत आहेत तळी उचलण्याचा कार्यक्रम सुद्धा येथेच होत असून वाघ्या मुरळी मोठ्या भक्ती भावाने सर्व भाविकांची सेवा करत असून पोलीस प्रशासनाने व महानगरपालिकेतर्फे चोख बंदोबस्त व आरोग्य सुविधा ठेवण्यात आली असून संस्थातर्फे भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे तीर्थप्रसाद फुलहाराबरोबरच खेळणी व गृह उपयोगी वस्तूंच्या दुकानांनी जत्रेचा माहोल सजला असून तीन दिवस चालणाऱ्या या जत्रेमध्ये मराठवाड्यासहित बाहेरील लाखो भाविक दर्शनाला येऊन नवस फेडतात आज शनिवार आहे उद्या रविवार व सुट्टी असल्यामुळे भाविकांची गर्दी वाढणार असून प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे