गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर मलकापूर शहर पोलिसांची मोठी कारवाई!
85 लाख 36 हजाराचा मुद्देमाल जप्त
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे शहर पोलिसांकडून महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर धडाकेबाज कारवाई आज दिनांक 07 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली कऱण्यात आली असून कारवाई 85 लाख 36 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की
पोलीस निरीक्षक श्री गणेश गिरी यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली की भुसावळ च्या दिशेने नॅशनल हायवे 53 वरून एक आयशर ट्रकमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात आहे.त्या अनुषंगाने श्री गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली मलकापुर शहर पोलीसांनी यादगार हॉटेल परिसरात पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले.पोलिसांना मिळालेल्या वाहनाच्या क्रमांकावरून ट्रक येत असताना पोलिसांनी त्यास थांबवण्याचा इशारा केला. ट्रक थांबविल्यानंतर, चालकाला विचारणा केली असता त्याने आपले नाव शहीद रहेमत (वय 37, रा. मेवात, हरियाणा) असे सांगितले. परंतु त्याचे उत्तर अव्यक्त आणि गोंधळलेले होते, यामुळे पोलिसांचा संशय वाढला.त्यानंतर पोलिसांनी ट्रकचे मागील गेट उघडून तपास केला असता त्यावर एक सिल लागलेला दिसला. यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि शासकीय पंचांना उपस्थित करून त्या वाहणाचे सिल तोडले आणि गाडीतील मालाची तपासणी केली. तपासणी दरम्यान, गाडीमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू असलेल्या असंख्य पोते आढळून आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात, व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक श्री गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली मलकापुर पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री गजानन कौळासे, श्याम कपले, दिलीप रोकडे, आनंद माने, शेख आसिफ, योगेश तायडे, संतोष कुमावत व नवल राठोड यांच्यासह आदींनी केली.