सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रस्तावित नवीन रेल्वे टिकीट खिडकी करू नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार: हिंदु सेवा सहाय्य समिती

नंदुरबार : नंदुरबार रेल्वे स्टेशनवर प्लेट फ्रॉम क्रमांक तीनचा पलीकडे नवीन टिकीट खिडकी बनविणे प्रस्तावित आहे. त्याठिकाणी तिकीट काढण्यासाठी पटेलवाडी, बादशहा नगर असे कॉलनी परिसरातून येण्यास प्रवाशांना त्रास होईल म्हणून प्रस्तावित नवीन रेल्वे टिकीट खिडकी त्याठिकाणी करू नये तसे करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या आशयाचे निवेदन हिंदु सेवा सहाय्य समिती आणि नागरिकांनी वरीष्ठ मंडल अभियंता यांना सिनियर सेक्शन इंजिनिअर राजेश रंजन यांचा मार्फत दिले.

Rohit Patil
  • Dec 10 2024 4:00PM

निवेदनात म्हटले आहे की, शहराच्या रेल्वेपट्या पलीकडे मोठ्या प्रमाणावर शहर विकसित होत आहे, त्या दृष्टीने नवीन टिकीट खिडकी होणे आवश्यक आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने पटेलवाडी- बादशहा नगर कडे जाणाऱ्या रेल्वे मार्ग जवळ प्रस्तावित नवीन टिकीट खिडकी बनविणार आहे. पटेलवाडी किंवा बादशहा नगर हे कॉलनी परिसर आहे त्या भागातून प्रवाशांना आपली वाहने घेऊन जाऊन टिकीट काढणे शक्य नाही, कारण कॉलनीचे रस्ते अतिशय लहान आहेत आणि त्यातही कॉलनीची रहदारी असते. त्यामुळे पुढील भविष्याचा विचार करता या भागातून प्रवाशांना टिकीट खिडकीपर्यंत जाणे अवघड होणार आहे. तरी रेल्वे प्रशासनाने सदर नवीन तिकीट खिडकी ही भगवा चौक म्हणजे उड्डाणपुलाच्या खालच्या भाग किंवा बर्फ कारखाना याच्या समोरील भागास केले तर सर्व प्रवाशांना सोयीचे होईल. जनभावनांचा विचार न करता रेल्वे प्रशासनाने त्याचठिकाणी टिकीत खिडकी बनविण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, संतोष जैन, घनश्याम मराठे, पंकज मुसळे, गणेश राजपूत, उज्वल राजपूत, गणेश भोई, निलेश ज्ञानगावकर, नारायण राजपूत, सचिन चौधरी, संदीप राजपूत, भाविक भाभाणी, भटू पाटील, मुकेश अहिरे, कपिल गिरासे आदी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार