मा मंत्री डॉ भारती पवार यांची कळवण तालुक्यातील अनेक गावांमध्ये डोंगऱ्यादेव उत्सवाला भेट
*आदिवासींच्या कुलदैवत डोगऱ्यादेवाची पूजा: परंपरा, श्रद्धा आणि एकता यांचा उत्सव*
कळवण तालुक्यातील प्रश्चिम पट्ट्यात आदिवासींचे कुलदैवत
डोगऱ्यादेवाची सुरु झाली.पूजा आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. गुजरात, महाराष्ट्र, आणि मध्य प्रदेशातील आदिवासी भागांत या पूजेला विशेष महत्त्व दिले जाते. निसर्गाशी जोडलेले हे कुलदैवत आदिवासींना एकात्मतेचा अनुभव देते.
डोगऱ्यादेवाला आदिवासी समाजात निसर्गाशी नाळ जोडणारे देव मानले जाते. या पूजेत निसर्गाची उपासना, स्थानिक गाण्यांचे महत्व, आणि श्रमाची प्रतिष्ठा यांचा संगम पाहायला मिळतो.
प्रत्येक गावात डोगऱ्यादेवासाठी एक खास जागा निश्चित केलेली असते. या जागेला फुलखळी असे म्हटले जाते.
मा मंत्री डॉ भारती पवार या कळवण तालुक्यात डोंगऱ्यादेव उत्सवाला भेट व शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या त्या म्हणाल्या की डोंगऱ्यादेव आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे,त्याच्या पूजेमुळे आमच्या आदिवासी समाजाला निसर्गाची ताकद आणि आमची परंपरा टिकवण्याची नवीन एक प्रेरणा मिळते