सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बीजेपीची ऐतिहासिक विजय: चंद्रशेखर बावनकुले यांच्या ‘पंचतत्व’ रणनीतीचा प्रभाव

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (बीजेपी) जोरदार विजय मिळवत आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे. या यशामागे पक्षाच्या कुशल रणनीतीबरोबरच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. ओबीसी समाजाचे नेतृत्व करत, बावनकुले यांनी ‘पंचतत्व’ रणनीतीच्या माध्यमातून भाजपच्या विजयाचा पाया रचला.

Rohit Patil
  • Dec 17 2024 8:07PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणेला महाराष्ट्रात जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम बावनकुले यांनी यशस्वीपणे केले. त्याचबरोबर ओबीसी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभर त्यांनी व्यापक दौरे केले. अनेक बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद आणि बुथ पातळीवर केलेल्या मेहनतीचा मोठा परिणाम निवडणुकीत दिसून आला.
 
बूथ व्यवस्थापनाला नवे आयाम देत, बावनकुले यांनी ३०,००० पेक्षा अधिक बूथवर पक्षाचे काम मजबूत केले. महायुती सरकारच्या योजनांना भाजपच्या ब्रँडसह लोकांपर्यंत नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. फसल विमा, कर्जमाफी आणि मुलींसाठीच्या योजना यांचा प्रचार घराघरात पोहोचवला.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजप संघटनेत तालमेल साधत, चंद्रशेखर बावनकुले यांनी पक्षाच्या प्रचाराला आणखी बळ दिले. त्यांच्या रणनीतीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे भाजपच्या बाजूने फिरली आणि हा विजय ऐतिहासिक ठरला.
 
बावनकुले यांच्या मेहनतीने भाजपला नवसंजीवनी मिळाली असून हा विजय पक्षाला २०२९ लोकसभा निवडणुकीसाठी मजबूत पायाभूत सिद्ध होईल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार