मुंबई: 28 डिसेंबरला मुंबई समुद्रात हेमदीप टिपरी यांच्या मालकीच्या तिसाई या मासेमारी नौकेला चीन येथील मालवाहतूक जहाजाने धडक दिली होती.या धडकेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मासेमारी नौकेचे मोठे नुकसान झाले होते. स्थानिक परवाना अधिकारी,सागरी पोलीस, बंदर निरीक्षक व मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष पंचनामा केला गेला होता. त्यानुसार रुपये 18.55 लक्ष इतके तीसाई नौकेचे नुकसान झाले होते.
5 जानेवारीला मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार संबंधित जहाज कंपनी व अपघातग्रस्त नौका मालक यांची बैठक लावण्यात आली. त्या बैठकीत चीन येथील कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते.
सदरच्या नुकसान भरपाईचा रुपये 18.55 लक्ष रकमेचा धनादेश मा मुख्यमंत्री यांच्या हस्ते तीसाई नोकेच्या मालकाला प्रदान करण्यात आला.यावेळी मत्स्य व्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे,मंत्री मंडळातील अन्य सदस्य, एन रामास्वामी (सचिव,मत्स्यव्यवसाय विभाग), मत्स्यव्यवसाय आयुक्त पंकज कुमार,मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त महेश देवरे उपस्थीत होते.