सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आतंकवादाचे केंद्र कुठे आहे, हे जगाला ठाऊक आहे; जाफर एक्सप्रेस रेल्वे अपहरणामागे भारताचा हात असल्याचा पाकचा आरोप भारताने फेटाळला

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसारित करून म्हटले आहे, की जगाला ठाऊक आहे, की आतंकवादाचे केंद्र कुठे आहे?

Sudarshan MH
  • Mar 15 2025 11:21AM

दिल्ली: पाकमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने अपहरण केलेल्या जाफर एक्सप्रेसमागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकने केला होता. भारताने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसारित करून म्हटले आहे, की जगाला ठाऊक आहे, की आतंकवादाचे केंद्र कुठे आहे? पाकिस्तानने स्वतःच्या अंतर्गत समस्या आणि अपयश, यांसाठी इतरांकडे बोटे दाखवण्याऐवजी आणि इतरांना दोष देण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे.

पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी दावा केला होता, की जाफर एक्सप्रेसच्या घटनेत सहभागी असलेले बंडखोर अफगाणिस्तानातील त्यांच्या सूत्रधारांच्या संपर्कात होते. अपहरण केलेली रेल्वे सोडवल्याचा पाकिस्तानी सैन्याचा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने आधीच फेटाळला आहे. या संघटनेने निवेदन प्रसारित करून म्हटले आहे, की जर पाकिस्तानी सैन्याने खरोखरच ओलिसांना सोडवले असेल, तर ते त्या ओलिसांची छायाचित्रे का प्रसिद्ध करत नाही?

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार