सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शरद पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; भाषणाचे कौतुक करत आभार मानून केली 'ही' मागणी

सात दशकांनंतर मराठी साहित्य संमेलन दिल्लीत झाले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर आले होते.

Sudarshan MH
  • Mar 15 2025 12:02PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच शरद पवार यांने नरेंद्र मोदींचे कौतुक देखील केले आहे. इतकेच नाही तर शरद पवार यांनी या पत्रामध्ये आपली एक मागणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर आले होते. या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष हे शरद पवार असल्याने त्यांनी पंतप्रधानांनी या संमेलनाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे पत्रातून आभार मानले आहेत. तुमचे सखोल आणि अंतर्दृष्टी पूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांना खूप भावले, असा उल्लेख देखील शरद पवार यांनी आपल्या पत्रात केला आहे. सात दशकांनंतर मराठी साहित्य संमेलन दिल्लीत झाले आहे.

दरम्यान, दिल्लीत पार पडलेल्या या संमेलनाचे ठिकाण असलेल्या तालकटोरा स्टेडियममधे बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे अर्धाकृती पुतळे बसवण्याचा प्रस्ताव सरहद संस्थेने मांडला आहे. पण अनेक साहित्यिकांची मागणी आहे की पूर्ण आकाराचे घोडेस्वारी पुतळे उभारले जावेत. तालकटोरा स्टेडियम हे नवी दिल्ली महानगरपालिकाच्या अखत्यारीत येत असल्याने अश्वारूढ पुतळे बसविण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्यासाठी दिल्ली सरकार आणि NDMC ला निर्देश देण्याबाबत आपण सांगावे, अशी मागणी ही शरद पवार यांनी पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून अर्धाकृती पुतळा बसवला जावा, अशी अमित शाह यांना विनंती केली होती. मात्र आता साहित्यिकांची मागणी लक्षात घेता शरद पवारांनी ही यात हस्तक्षेप करत आपली मागणी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार