धुळे: शिव प्रेरणा यात्रेदरम्यान आज धुळे येथे धर्मयोद्धा डॉ. श्री. सुरेश चव्हाणके यांचे देशहितासाठी, राष्ट्र हितासाठी १०० टक्के मतदान करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. महाराष्ट्रातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी दि. ७ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर पर्यंत भव्य शिव प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यावेळी बोलतांना डॉ. श्री. सुरेश चव्हाणके म्हणाले, की १००% मतदानाचा प्रचार करायला आलो आहे, हिंदू उमेदवार निवडून द्या म्हणत नाही पण हिंदुत्ववादी उमेदवार नक्की निवडून द्या. 'बटेंगे तो कटेंगे' त्यामुळं जाती - जातीत विभागले जाऊ नका. हिंदू म्हणून एक या. निवडणुकीसाठी जे हिंदुत्ववादी उमेदवार उभे राहणार आहेत, त्यांना आधी लव्ह जिहाद, भूमी जिहाद, गो - हत्या बंदी यासंदर्भात सरकार समोर बाजू मांडण्यास सांगा. धर्म वाचवायचा असेल, तर राजसत्ता पण वाचली पाहिजे. मतदानाच्या दिवशी सर्व हिंदूंनी १०० टक्के उपस्थित राहून मतदान करा.
महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री जर मुस्लिम होणार असेल, तर त्याचा मी विरोध करेल. मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरीही माझा त्याला विरोध असेल. व्होट जिहाद होवू देणार नाही, यासाठी उपस्थित हिंदूंच्या सोबत शपथ घेण्यात आली. जवळपास सर्वच व्यवसायांमध्ये मुस्लिमांनी ताबा मिळवला आहे, त्यासाठी हिंदूंनी जास्तीत - जास्त प्रमाणात व्यवसायात उतरा. मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाका. हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करा.
शिव प्रेरणा यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १ कोटी घुसखोरांवर कारवाईची मागणी केली जाणार आहे, ज्यामुळे राज्य सुरक्षित, स्थिर आणि संपन्न होईल. महाराष्ट्रात सध्या बांग्लादेशी, रोहिंग्या, आणि पाकिस्तानी घुसखोरांची संख्या चिंताजनक आहे. त्यांना बाहेर काढल्यास चाळीस लाख रोजगाराच्या संधी आणि १२ लाख घरे मराठी जनतेसाठी उपलब्ध होतील. यामुळे गुन्हेगारी कमी होऊन राज्यावरचा आर्थिक ताणही कमी होईल. जनता एन. आर. सी. चळवळ घुसखोरांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक समस्यांना सोडवण्यासाठी समर्पित आहे.
या आंदोलनात सर्वांनी सहभागी होऊन महाराष्ट्राला घुसखोर मुक्त करण्याच्या या संकल्पात सक्रिय सहभाग घ्यावा. 'www.JananNRC.org’ या संकेतस्थळावर या अभियानाची माहिती देण्यात आली आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी आणि पाठींबा देण्यासाठी ९२०९४२०४२०४ या क्रमांकावर संपर्क करा.