सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सकल हिंदू समाजाने केली ज्ञानेश महाराव यांना श्री शिवाजी नाट्यमंदिराच्या कार्यकारिणीतून बाहेर काढण्याची मागणी

आमचे देवी - देवता, साधू - संत आणि आदर्श यांचा कुणी अवमान आणि अपप्रचार करत असेल, तर आम्ही खपवून घेणार नाही. त्यासाठी आम्ही संवैधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करू, असे या निवेदनात म्हटले आहे.

Sudarshan MH
  • Sep 25 2024 8:31AM

मुंबई: प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्या संदर्भात निंदनीय वक्तव्य करणारे ज्ञानेश महाराव यांना मुंबई येथील प्रसिद्ध श्री शिवाजी नाट्यमंदिर या नाट्यगृहाच्या कार्यकारिणीतून काढा, अशा मागणीचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आले आहे. नुकतेच नाट्यगृहाचे अध्यक्ष कर्नल सुधीर सावंत (निवृत्त) यांना हे निवेदन देण्यात आले.

वाशी येथे काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्याविषयी बेताल आणि निंदनीय वक्तव्य केले होते. असे वक्तव्य केवळ मानसिक संतुलन बिघडलेली समाजकंटक व्यक्तीच करू शकते. त्यामुळे श्री शिवाजी नाट्यमंदिर या नामांकित संस्थेच्या कार्यकारिणीतून महाराव यांना काढून टाकण्यात यावे आणि आपल्या संस्थेचा मान कायम राखावा. आमचे देवी - देवता, साधू - संत आणि आदर्श यांचा कुणी अवमान आणि अपप्रचार करत असेल, तर आम्ही खपवून घेणार नाही. त्यासाठी आम्ही संवैधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करू, असे या निवेदनात म्हटले आहे. या वेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवेदन दिले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार