सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

२७ ऑक्टोबर पासून कोल्हापूर ते अहमदाबाद थेट विमानसेवा

२७ ऑक्टोबर पासून कोल्हापूर - अहमदाबाद - गुजरात नियमित विमानसेवा सुरू होणार आहे.

Sudarshan MH
  • Sep 25 2024 8:59AM
कोल्हापूर: कोल्हापूरहून अहमदाबादला व्यापार व्यवसायामुळे नियमितपणे ये-जा करणार्‍या ग्राहकांची संख्या खूप आहे. त्यासाठी कोल्हापूरहून अहमदाबादला थेट विमान सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. खासदार धनंजय महाडिक हे याबाबत सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांना यश आले असून २७ ऑक्टोबर पासून कोल्हापूर - अहमदाबाद - गुजरात नियमित विमानसेवा सुरू होणार आहे. 
 
खूप वेळेपासून प्रलंबित असणारी कोल्हापूर करांची आणखी एक मागणी आता येत्या 27 ऑक्टोंबर पासून पूर्ण होत आहे. 27 ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते अहमदाबाद गुजरात या मार्गावर थेट विमानसेवा सुरू होणार आहे. स्टार एअर लाईन कंपनीचे सुमारे 50 आसन क्षमतेचे विमान, कोल्हापूर - अहमदाबाद - कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करेल. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या विमान सेवेमुळे अहमदाबाद सोबतच संपूर्ण गुजरात, राजस्थानसह उत्तर भारताशी कोल्हापूर हवाई सेवेने कनेक्ट होणार आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
कोल्हापूर- अहमदाबाद गुजरात ही सेवा सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी सुरू राहणार असून, कोल्हापूरहून सकाळी ११ वाजता विमान उडाण करेल आणि १२ वाजून २० मिनिटांनी अहमदाबादला पोचेल. तसेच अहमदाबादहून १२ वाजून ४५ मिनिटांनी विमान उडेल आणि २ वाजून ५ मिनिटांनी कोल्हापुरात पोचेल. त्यासाठी तिकीटाचे बुकींग सुरू झाल्याचीही माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार