बीड: बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका दाखल झाल्यानंतर वाल्मीक कराडचा ताबा एसआयटीने घेतला होता. त्यानंतर त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर आज ही कोठडी संपल्यावर कराडला बीड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने बुधवार, दि.२२ जानेवारी रोजी खंडणी आणि मकोका प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडची आज बीड न्यायालयात सुनावणी झाली.
काल वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचे एकत्रित २९ नोव्हेंबरचा आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. केज शहरातील विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड २९ नोव्हेंबरला आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पीएसआय राजेश पाटील हेसुद्धा यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत दिसत आहेत. त्यामुळे खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे बोलले जात आहे