सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

भारताचे पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर; भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक

भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीवर सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत बुधवारी झालेल्या निर्णयांची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी दिली.

Sudarshan MH
  • Apr 24 2025 7:24AM

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या भीषण हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या देशावर भारताने बुधवारी कायदेशीर स्ट्राइक केला. सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया जोपर्यंत थांबत नाहीत, तोपर्यंत दोन्ही देशांतील सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयांतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ५५ वरून ३० वर आणली जाणार आहे.

अटारी - वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तत्काळ बंद करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. मात्र, तिथून प्रवेश केलेल्या पाकिस्तानी नागरिकांना येत्या १ मेपर्यंत भारतातून पुन्हा त्यांच्या मायदेशात परत जाता येईल असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्त कार्यालयातील संरक्षण, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संपर्काधिकाऱ्यांना एक आठवड्याच्या आत भारत सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या उच्चायुक्त कार्यालयांतील पाच सहायक कर्मचाऱ्यांनाही माघारी बोलाविण्याचा आदेश भारताने दिला. हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीवर सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत बुधवारी झालेल्या निर्णयांची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार