पुणे: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी - चिंचवड शहरात राहणारे रोहिंग्या, बांगलादेशी घुसखोर आणि त्यांच्या अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मागणी सभागृहात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पिंपरी - चिंचवड महापालिकेने बुलडोझर चालवत बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे.
पिंपरी - चिंचवड शहरातील कुंदळवाडी परिसरात रोहिंग्या बांगलादेशी घुसखोर बेकायदेशीरपणे राहतात. याच कुंदळवाडीत परिसरात हजारो अनधिकृत भंगार व्यापारी बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांचा व्यवसाय करत आहेत. या भागात दहशतवादी यासीन भटकल देखील राहत होता आणि पासपोर्ट आणि आधार कार्ड बनवून फसवणूक करत होता. तसेच देशविरोधी कारवायांना प्रोत्साहन देण्याचे काम या शिव परिसरातील जिहादी करतात. या परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर छावण्याही आहेत, जिथे रोहिंग्या, बांगलादेशींना आधार दिला जातो. आता पिंपरी - चिंचवड पोलिसही कारवाईत आले असून, या परिसरात राहणाऱ्या रोहिंग्या, बांगलादेशींचीही पोलिस चौकशी करत आहेत.