सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ममता कुलकर्णींची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी; लक्ष्मी नारायण त्रिपाठींनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवले

ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनवल्यापासून नवा वाद सुरु झाला होता.

Sudarshan MH
  • Feb 1 2025 8:19AM
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना किन्नड आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबतच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आले आहे. याबाबत किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी नुकतीच घोषणा करत किन्नर आखाड्याची पुनर्रचना केली जाणार असल्याचेही सांगितले.
 
ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनवल्यापासून नवा वाद सुरु झाला होता. एखाद्या स्त्रीला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर कसे केले जाऊ शकते? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ दरम्यान ममता कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी आपले पिंडदान करून संन्यास घेतला होता. यानंतर भव्य स्वरुपात पट्टाभिषेक करत त्यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर करण्यात आले होते. लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि ममता कुलकर्णी या दोघींचीही किन्नर आखाड्यातून हकालपट्टी केली असून नवीन आचार्य महामंडलेश्वर यांची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचे ऋषी अजय दास यांनी सांगितले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार