सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिहादी कासिम पठाणच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या हिंदू पूजा पवार प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाईची मागणी

१९ ऑगस्ट रोजी ओव्हरगाव येथील पूजा पवार या युवतीने जिहादी कासिम पठाण याच्याकडून जबरदस्तीने व जीवे मारण्याची धमकी देऊन आत्महत्या केली होती.

Sudarshan MH
  • Aug 26 2024 5:00PM

छत्रपती संभाजीनगर: जिहादी कासिम पठाणच्या अत्याचाराला कंटाळून हिंदू मराठा पूजा पवार आत्महत्या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी मराठा समाजातील मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त यांची नरेंद्र अण्णासाहेब पाटील, अध्यक्ष (मंत्री दर्जा), आर्थिक मार्ग विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांनी भेट घेतली.

 
१९ ऑगस्ट रोजी ओव्हरगाव येथील पूजा पवार या युवतीने जिहादी कासिम पठाण याच्याकडून जबरदस्तीने व जीवे मारण्याची धमकी देऊन आत्महत्या केली होती. आज नरेंद्र पाटील यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेऊन कुटुंबाचे सांत्वन केले. याबाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करून पवार कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन नरेंद्र पाटील यांनी दिले.
 
त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी पोलीस आयुक्त कार्यालय गाठून पोलीस आयुक्तांची भेट घेतली. फरार आरोपींना अटक करून आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, पूजा पवार अभ्यासात हुशार होती. तिला दहावीत 96 टक्के गुण मिळाले होते आणि ती सध्या NEET परीक्षेच्या तयारीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील कोचिंग क्लासमध्ये शिकत होती. आरोपी कासिम पठाण आणि त्याचे नातेवाईक आणि मित्र पूजाला मानसिक त्रास देत होते. त्यांनी तिला लव्ह जिहादमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्यांचे म्हणणे न ऐकल्याने त्यांनी तिला वारंवार धमक्या दिल्या. या तणावातूनच पूजाने आत्महत्या केली.
 
याशिवाय आरोपीचे नातेवाईक पवार कुटुंबीयांना धमक्या देत आहेत, त्यामुळे त्यांना आपल्या कृत्याचा पश्चातापही होत नाही. त्यामुळे नरेंद्र पाटील यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन आरोपींवर कडक कारवाई करून ओव्हर गावात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार