सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात स्वच्छता मोहीम

डास व मच्छर, घाणीची दुर्गंधी याचा त्रास पर्यटकांना होऊ नये, स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.

Sudarshan MH
  • Sep 25 2024 8:54AM

रत्नपूर: जगप्रसिद्ध  वेरूळ  लेणी परिसरातील अतिक्रमण G - 20  परिषदे दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय  यांनी अतिक्रमण हटविले होते. परंतु पुन्हा लेणी परिसरात अतिक्रमण झाले असून या रोडवर लागलेल्या दुकानांमुळे पर्यटकांना मोठा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यातच या  अतिक्रमानामुळे छोटे - मोठे अपघात घडत असतात.  या दुकानांच्या जागेचे मालक कोण आहेत? याबाबत स्पष्टता नसली, तरी मात्र जागा भाडे पट्टीवरून मोठी आर्थिक उलाढाल या ठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू आहे.

या परिसरामुळे विदेशी पर्यटकांना रहदारीचा त्रास होत असून अतिक्रमानाचे ओंगळ दर्शन घडत आहे. या ठिकाणी प्रचंड घाण त्यात फळांचे सालटे , प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक बॅग, मोठ्या प्रमाणात जमा होत असून त्यामुळे परिसरात घाणीचं साम्राज्य दिसून येत आहे. या स्वच्छता मोहिमेमध्ये शिवकुमार सांभा, उप अधीक्षक अभियंता डॉ. प्रशांत सोनवणे, सहाय्यक अधीक्षक पुरातत्त्व विभाग, डी. स. सहाय्यक अधीक्षक पुरातत्व राजेश वाकलेकर अभियंता उपमंडळ प्रभारी वेरूळ यांच्या पुढाकाराने मंगळवारी वेरूळ लेणी समोर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या स्वच्छता मोहिमेत ग्रामपंचायत वेरूळ कार्यकारी मंडळ, पोलीस अधिकारी भारतीय पर्यटन विभाग यांनी सहभाग घेतला. मात्र, वेरूळ लेणी बाहेर राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र घाण पसरली आहे. पुरातत्व विभाग जेसीबीच्या साह्याने कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे रस्ता हा मोकळा झाला आहे. डास, मच्छर यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डास व मच्छर, घाणीची दुर्गंधी याचा त्रास पर्यटकांना होऊ नये, स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार