नुकत्याच पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठीमुळे शेतकऱ्यांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे बुधवार २९ नोव्हेंबर रोजी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे गारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
सकाळी ८ वाजता बुलढाणा जिल्ह्यातील तुळजापुर, गोळेगाव तालुका देऊळगावराजा येथे
सकाळी ९ वाजता पळसखेडा चक्का तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा
सकाळी १०.३० वा. मौजे राजेवाडी तालुका बदनापुर जिल्हा जालना
सकाळी ११.१५ वा.मौजे लाडगाव ता. जि. संभाजीनगर
दुपारी २ वा. विभागीय आयुक्त संभाजीनगर येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाचत चर्चा
स्थळ: विभागीय आयुक्त कार्यालय, संभाजीनगर
दुपारी ३ वा. सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद