सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईतील बांगलादेशींना हद्दपार करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रोखठोक भूमिका

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली.

Sudarshan MH
  • Dec 23 2024 8:52AM

मुंबई: मुंबईमध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याचे काम चालू करण्यात आले आहे. बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करणार, ही सरकारची रोखठोक भूमिका असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांसह अन्य मंत्री उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो अभियनामध्ये सहभागी असलेल्या १८० संघटनांतील काही संघटना अर्बन नक्षलवादाशी संबंधित आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असतांना वर्ष २०१०, वर्ष २०११, वर्ष २०१३ आणि वर्ष २०१४ मध्ये या संघटना अर्बन नक्षलवादी असल्याची माहिती केंद्र सरकारला पाठवण्यात आली होती. संतोष देशमुख हत्याप्रकरणी पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही.’’

धार्मिक स्थळांच्या नियंत्रणाबाबतचा कायदा सर्वांना समान असावा. केवळ हिंदूंचीच नव्हे, तर अन्य धर्मियांची धार्मिक स्थळेही नियंत्रणात आणण्याविषयी सरकारने विचार करावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे. त्याविषयी सरकारची भूमिका काय, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, मुळात मंदीर आणि अन्य धार्मिक स्थळांवर नियंत्रणासंदर्भात वेगवेगळे कायदे आहेत. मुस्लिमांकरिता वक्फ आहे. काही ठिकाणी ट्रस्ट आहेत, काही ठिकाणी कायदे केलेले आहेत. त्यामुळे आपण त्याच पद्धतीने सध्या चाललो आहोत. विधानसभा अध्यक्षांनी यानिमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे. त्याचा कायदेशीर अभ्यास करावा लागेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार