सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार उद्या मूल येथे दाखल करणार उमेदवारी अर्ज

सलग सातव्या विजयासाठी सज्ज असलेले ना. श्री. मुनगंटीवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच समर्थक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

Sudarshan MH
  • Oct 27 2024 8:36PM

मुल: राज्यात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीने सुपरिचित, विविध विकासकामांच्या माध्यमातून बल्लारपूर मतदारसंघ जगाच्या नकाशावर आणणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते, महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले असून, या क्षेत्रासाठी केलेल्या विकासकामांमुळे निश्चित विजय होईल असा विश्वास श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. 

सलग सातव्या विजयासाठी सज्ज असलेले ना. श्री. मुनगंटीवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच समर्थक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. २८ ऑक्टोबरला (सोमवारी) सकाळी ११.०० वाजता मुल येथील उपविभागीय कार्यालयात श्री मुनगंटीवार उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी भाजपासह महायुतीच्या घटक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

मतदारसंघातील नागरिकांनी यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केले आहे. अर्ज भरण्यापूर्वी ना. श्री. मुनगंटीवार मतदारसंघातील नागरिकांचा आशीर्वाद घेऊन  येथील बाजार चौकातून उपविभागीय कार्यालयाकडे प्रस्थान करतील. विविध विकासकामांच्या माध्यमातून मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा ना. श्री. मुनगंटीवार यांनी बदलला आहे. बल्लारपूर मतदारसंघाचे नेतृत्व करताना संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेईल एवढी विकासकामे केली. 

बल्लारपूर, मुल व पोंभूर्णा येथे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सर्वांगिण विकासाचे धोरण राबविण्यावर ना. श्री. मुनगंटीवार यांचा भर राहिलेला आहे; विरोधकही त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करतात.  शेतकरी बांधव असोत, महिला असोत किंवा तरुणवर्ग असो प्रत्येकाच्या कल्याणासाठी व सक्षमीकरणासाठी ना. श्री. मुनगंटीवार सदैव अग्रेसर असतात. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सलग सहा वेळा विधानसभा निवडणुकांमध्ये विजय प्राप्त केला आहे. आता २०२४ च्या निवडणुकीतही ते विजयी होतील असा विश्वास भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार