सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अकोल्यात शिवशंभू विचारांचा प्रचार - प्रसार करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी केली बेदम मारहाण; संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

शिवशंभूंच्या विचारांचा प्रचार - प्रसार करणे गुन्हा आहे का? अकोल्यातील या शिवप्रेमी तरुणाला शिवशंभूंच्या विचारांचा प्रचार - प्रसार केल्याने बेदमपणे मारहाण होणे, ही दुर्दैवी घटना आहे.

Sudarshan MH
  • Mar 24 2025 6:39AM
अकोला: अकोला जिल्ह्यातील लोहारा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिम्मित महाराजांचे अश्वारूढ घोड्यावर असलेले स्टेटस व्हॉट्स ॲपवर ठेवल्याच्या कारणावरून उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले यांनी दोन तरूणाला धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत अमानुषपणे काठीने बेदम मारहाण केल्याचा संपातजनक प्रकार घडला आहे.
 
गावातील गावातील आपल्या व्हॉट्स ॲप स्टेटसवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ घोड्यावर असलेले चित्र ठेवल्याने ठाणेदार गोपाल ढोले यांना त्याचा राग आला. हा राग अनावर होऊन ठाणेदार गोपाल ढोले यांनी काठीने तरूणाला बेदम मारहाण केली. तरुणाचे शरीर जखमी झाले असून, त्याला उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
या अत्याचाराच्या घटनेने लोहारा गावातील ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत आणि ठाणेदार गोपाल ढोले यांच्याविरुद्ध पन्नासहून अधिक गावकऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धाव घेत तक्रार करीत सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीत तरूणाला अमानुष मारहाण, तसेच पोलीस दलाचे चुकीचे वर्तन यावर तात्काळ कारवाई करण्याची विनंती केली आहे.
 
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ज्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले, ज्यांनी स्वराज्य रक्षणासाठी आणि धर्मरक्षणासाठी बलिदान दिले, त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार - प्रसार करणे गुन्हा आहे का? अकोल्यातील या शिवप्रेमी तरुणाला शिवशंभूंच्या विचारांचा प्रचार - प्रसार केल्याने बेदमपणे मारहाण होणे, ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेमुळे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी या प्रकरणातील संबंधित दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर कठोरातील - कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार