सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मालेगाव येथील विराट हिंदू संत संमेलनाच्या कार्यक्रमाला परवानगी मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे अर्ज

सकल हिंदू समाज मालेगाव यांनी समितीच्या माध्यमातून केलेल्या ठरावाप्रमाणे गुढीपाडवा, दि. ३० मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता यशश्री कंपाउंड, सटाणा नाका, मालेगाव या ठिकाणी विराट हिंदू संत संमेलनाचा कार्यक्रम होणार आहे.

Sudarshan MH
  • Mar 25 2025 4:41PM

मालेगाव: मालेगाव येथे होणारा गुढीपाडवा दि. ३० मार्च २०२५ रोजी आयोजित विराट हिंदू संत संमेलनाचा कार्यक्रम प्रतिवर्षी सालाबादप्रमाणे पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. कोरोनाच्या कार्यकाळामध्ये लॉकडाऊन परिस्थिती तयार झाल्यानंतर सदर कार्यक्रम स्थगित झालेला होता. परंतु यावर्षी गेल्या महिन्यापासून सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सुरू असून शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत विराट हिंदू संत संमेलन मालेगावसाठी नियोजन व कार्यक्रम कायदा सुव्यवस्थेचे पालन करून शांततेत पार पाडण्यासाठी सर्व पक्ष व संघटनात्मक सकल हिंदू समाज, मालेगावची समिती तयार करण्यात आलेली आहे.

सकल हिंदू समाज मालेगावच्या वतीने अर्जदार राहुल नाना बच्छाव यांनी १८ फेब्रुवारी २०२५ रोजी तहसीलदार सो, मालेगाव यांच्याकडे परवानगीसाठी अर्ज सादर केलेला आहे. सदर अर्जावर पोलिस प्रशासनाचा अभिप्राय आवश्यक असल्याने अर्ज पोलीस निरीक्षक, छावणी पोलीस स्टेशन, मालेगाव यांच्याकडे आज रोजी प्रलंबित आहे. अर्जावर प्रतिक्रिया देतांना पोलीस प्रशासनाने नागपूर येथे झालेल्या घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रक्षोभक भाषण करणारे वक्ते असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून अर्जदार यांना तोंडी परवानगी नाकारली आहे. परंतु गेल्या सात दिवसांपासून अर्जदार हे प्रशासनाकडे परवानगी नाकारल्याचे लेखी पत्र सतत मागत आहे. तरी देखील आत्तापर्यंत प्रशासनाकडून लेखी उत्तर मिळालेले नाही. म्हणून सकल हिंदू समाज मालेगाव यांनी समितीच्या माध्यमातून केलेल्या ठरावाप्रमाणे गुढीपाडवा, दि. ३० मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता यशश्री कंपाउंड, सटाणा नाका, मालेगाव या ठिकाणी विराट हिंदू संत संमेलनाचा कार्यक्रम होणार आहे. 

सदर कार्यक्रमांमध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना दि. ३ मार्च २०२५ रोजी त्यांच्या भोपाळ येथील शासकीय निवासस्थानी काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज यांच्या माध्यमातून भेट देऊन निमंत्रण दिले आहे व "हिंदूवीर" पुरस्कार देणार असल्याची माहिती देखील दिलेली आहे. याप्रसंगी "हिंदूवीर" पुरस्कार स्वीकारण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी संमती देखील दर्शवली आहे.

सदर कार्यक्रमाबाबत परवानगी मिळण्यासाठी अर्जदार राहुल नाना बच्छाव यांनी आज रोजी उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. सदर अर्जावर लवकरात - लवकर कार्यवाही होऊन परवानगी मिळावी, यासाठी सकल हिंदू समाज मालेगावच्या समितीचा माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. आता याबाबत प्रशासन काय भूमिका घेते? व उच्च न्यायालय काय निर्णय देते? याकडे कार्यकर्ता व हिंदू बांधवांचे लक्ष आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार