सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देशात सातव्यांदा भीमाशंकर साखर कारखान्याचा डंका वाजला; देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार जाहीर

आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना कार्यरत असून, तो माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालवला जातो.

Sudarshan MH
  • Mar 24 2025 7:31AM

पुणे: भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला नॅशनल फेडरेशन ऑफ को - ऑप शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली यांच्याकडून सन २०२३ - २४ करीता “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” जाहीर झाला आहे. देशातील २०२३ - २४ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को - ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्काराची घोषणा शुक्रवार, दि. २१ रोजी करण्यात आली. ही माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्ली येथे होणार आहे. माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कर्ज परतफेड, व्याज व खर्च बचत, उत्पादन खर्च नियंत्रण, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेल्या ठेवीच्या पासबुक्स, संचित नफा, कारखान्याचे नक्त मूल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कार्ये या सर्व बाबींचा विचार करून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना कार्यरत असून, तो माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालवला जातो. स्थापनेपासूनच या कारखान्याचे संचालन वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आहे. पुणे जिल्ह्यात चांगल्या बाजारभावासाठीही हा कारखाना प्रसिद्ध आहे. तसेच, सात वेळा ‘सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’ पुरस्कार मिळवणारा देशातील एकमेव कारखाना असल्याचा दावा संस्थेच्या वतीने करण्यात येतो. यापूर्वीही या भीमाशंकर कारखान्याला देशपातळीवरील १३ आणि राज्यपातळीवरील १५ असे एकूण २८ पुरस्कार मिळाले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार